मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिलांना ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे त्यामुळे पोर्टल वर जाऊन अर्ज कसा करावा याची संपूर्ण माहिती आम्ही खाली दिलेली आहे.
पहिला टप्पा: नवीन अर्जदार नोंदणी
- अर्जदार महिलेला सर्वात प्रथम मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टल वर जावे लागेल.
- होम पेज वर अर्जदार लॉगिन वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला Creat Account वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर Sign Up पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल आणि Sign Up बटनावर क्लिक करावे लागेल.
- अशा प्रकारे तुमची Sign Up प्रक्रिया पूर्ण होईल.
दुसरा टप्पा: लॉगिन प्रक्रिया
- तुमची Sign Up प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला होम पेज वर यायचे आहे.
- होम पेज वर अर्जदार लॉगिन वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, पासवर्ड आणि कॅप्टचा कोड टाकून Login बटनावर क्लिक करावे लागेल.
दुसरा टप्पा: अर्ज भरण्याची प्रक्रिया
- लॉगिन केल्यावर तुमच्यासमोर होम पेज उघडेल.
- होम पेज मध्ये तुम्हाला Application of Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकावा लागेल.आणि Validate Aadhaar बटनावर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्या आधार संलग्न मोबाईल नंबर वर एक OTP येईल त्यामध्ये तो टाकून Submit बटनावर क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्यासमोर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल तसेच आवश्यक कागदपत्रे अपलोड करून Submit बटनावर क्लिक करावे लागेल.
- अशा प्रकारे तुमची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.